Top News खेळ

आयपीएलच्या सामन्यात मराठी समालोचनाचा पर्याय द्या, अन्यथा…; मनसेचा हॉटस्टारला इशारा

मुंबई | अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मोहिमेनंतर आता मनसेचे डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवलंय. सध्या आयपीएल सुरु असून या सामन्यांचं समालोचन मराठीमध्ये करण्यात यावं, ही मागणी पत्राद्वारे करण्यात आलीये.

मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हे पत्र ट्विटरवर शेअर केलंय. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, आयपीएलचं समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कन्नड आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. मात्र अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाहीये. आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी असून तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचं दिसतंय.

आयपीएलचा यंदाचा हंगाम संपण्याआधी कंपनीने मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा ही विनंती. जर या कंपनीने वेळेत यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर ‘मनसेच्या प्रचलित पद्धतीने आंदोलन करावं लागेल, अशा इशाराही मनसेने या पत्राद्वारे दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्धव”ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”

3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत- बाळासाहेब थोरात

…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या