बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऊसाच्या रसावर भन्नाट रॅप; गावातल्या पोरांच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकुळ, पाहा व्हिडीओ

सोलापूर | उन्हाळा आला की  लिंबू सरबत, उसाचा रस अशा थंड पेयांची आठवण सर्वांनाच येते. अशाच थंड पेयावर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या पोरांनी भन्नाट मराठी रॅप बनवला आहे. उसाच्या रसावर या पोरांनी इंग्लिश गाण्याच्या चालीवर मराठी रॅप बनवला आहे. या रॅपने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

खास रे टीव्ही हे यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या बार्शीतील तरुणांनी ‘पांडबाच्या रानातला उसाचा रस’ हे गाणं बनवलं असून त्याला ‘डेस्पासितो’ या इंग्रजी गाण्याच्या चालीवर सादरीकरण केलं आहे. हा व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असून लाखो लोकांची त्याला पसंती मिळत आहे.

व्यवसायातील स्पर्धा लक्षात घेता या पोरांनी उसाच्या रसाची जाहिरात करायचं ठरवलं आणि त्यासाठी मराठीत रॅप लिहून त्याचं उत्तम सादरीकरण करून ते सोशल मीडियावर पोस्ट केलं. त्यानंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातून या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.

गावातल्या पोरांनी बनवलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून या व्हिडिओच्या माध्यमातून ही पोरं ऊसाच्या रसाचे मार्केटिंग उत्तमरित्या करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच रसवंती चालवणार्‍या पांडबालाही त्यांनी मॉडेल प्रमाणे दाखवलं आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या

पत्नीसाठी रुग्णवाहिकेची वाट पाहून वैतागलेल्या पतीने केलं ‘हे’ कृत्य

“मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेमध्ये दहा वर्षात जी प्रगती केली नाही ती मोदींनी पाच वर्षात केली”

दादा-भाईंना दणका, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘या’ दोन मोस्ट वॅान्टेडला ठोकल्या बेड्या!

सोनम गुप्तानंतर आता पुष्पाचा संदेश चर्चेत; म्हणते दिपुजी मला पळवून न्या!

मोठी बातमी! राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचं कोरोनाने निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More