हवाई हल्ल्यात ‘जैश’चे मोठं नुकसान झाल्याची मसूद अजहरच्या भावाची कबुली

इस्लामाबाद | भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे काहीही नुकसान झालेलं नाही, असं पाकिस्तान सांगत आहे. मात्र हवाई हल्ल्यात ‘जैश-ए-मोहम्मद’चे मोठे नुकसान झाल्याची कबुली मसूद अजहरचा भाऊ मौलाना अम्मार याने दिली आहे.

अम्मारची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून यात तो हा खुलासा करताना दिसत आहे. ‘मर्काज’वर बॉम्ब पडल्याचं अम्मार बोलत आहे

अम्मारच्या या ऑडिओ क्लिपने पाकिस्तानी सरकार आणि त्यांच्या लष्कराला मोठी चपराक बसली आहे.

दरम्यान, पुलवाम्याचा बदला म्हणून भारताने ‘जैश’च्या तळांवर हल्ला केला होता. यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

“पाकिस्तानमध्ये ताकद नसेल तर त्यांनी भारताला सांगावं, आम्ही दहशतवाद संपवू”

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणेकरांनो, आज एफसी कॉलेज गेटवर गरजूंसाठी जुने-नवे कपडे अन् पुस्तकं द्या!

माननीय पंतप्रधान, तुम्हाला लाज वाटत नाही का?- राहुल गांधी

प्रकाश आंबेडकरांनी घातलेली अ़ट काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य