#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत. निष्ठा जैन नावाच्या पत्रकार महिलेनं विनोद दुवा यांच्यावर आरोप केले आहेत. 

निष्ठा जैन यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. स्वतःची मुलगी मल्लिका दुवासाठी अक्षयकुमारबद्दल लिहिणाऱ्या विनोद दुवा यांनी एकदा स्वतःच्या भूतकाळात पहावे, असं त्यांनी म्हटलंय. 

29 वर्षांपूर्वी म्हणजे 1989 साली मी मुलाखतीसाठी गेले होते. तेव्हा विनोद दुवा यांनी आपल्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला होता. मी दुसरीकडे जॉब शोधला, तिथंही त्यांनी माझा पाठलाग केला, असं पोस्टमध्ये म्हटलंय. 

दरम्यान, एकदा ते मला भेटण्यासाठी आले. मला वाटलं माफी मागायची असेल, मात्र त्यांनी त्यांच्या गाडीत माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निष्ठा जैन यांनी लावला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी

-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी

-मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय- चंद्रकांत पाटील

-आता महाराष्ट्रात दारूही मिळणार घरपोच?

-केंद्राच्या पॅकेजमुळे साखर उद्योगाला अच्छे दिन; पवारांकडून मोदीचं कौतुक

Google+ Linkedin