बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MG मोटर्सनं भारतात लाँच केली जबरदस्त गाडी, इच्यात जे ते कुणातच नाही!

नवी दिल्ली | प्रसिद्ध मॉरीस गॅरेज कंपनी आपल्या नविन गाड्यांसोबत भारतात आपलं ग्राहकांमध्ये स्थान निर्माण करत आहे. आज कंपनीने आपली नविन मिड साइज एसयुव्ही एमजी अँस्टारचं अनावरण केलं आहे. कंपनीने आर्टीफिशीयल इंटेलिजन्स सह आँटोनाँमस लेव्हल टू ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीमसह सुसज्ज अशी एसयुव्ही ग्राहकांच्या भेटीला आणली आहे.

कंपनीने असा दावा केला आहे की, भारतातील पहिली पर्सनल आर्टीफिशीयल इंटेलिजन्स असिस्टंट एसयुव्ही आहे. कंपनीने या एसयुव्हीसाठी जिओ या दुरसंचार कंपनीसोबत करार केला आहे. आर्टीफिशीयल इंटेलिजन्स असणारी भारतातील सर्वात स्वस्त कार असणार आहे असा दावा कंपनीने केला आहे.

आँटोनॉमस एसयुव्ही एमजी अँस्टार ही कार मिड रेेेंज रडार कार सह मल्टी पर्पज कॅमेरायुक्त असणार आहे. या कारमधील पर्सनल आर्टीफिशीयल इंटेलिजन्स असिस्टंट हे अमेरिकन फर्म स्टार डिझाईनने तयार केलं आहे. यामध्ये माणसासारख्या भावना आणि आवाज काढले जातात.

दरम्यान, स्मार्ट ड्राइव्ह सोबत आर्टीफिशीयल इंटेलिजन्स असिस्टंट सोबतच एलईडी लॅम्प, डे टाईम रनिंग लाईट, रुफ माउटेंड स्पाॅयलर, 8 इंचाची टचस्क्रीन सिस्टीम, सनरूफ असणार आहे. भारतात एमजी अँस्टार ही कार क्रेटा आणि सेल्टाॅस या गाड्यांना टक्कर देईल, असं कंपनीने सांगितलं आहे. मात्र, या कारची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केली नाही.

 

थोडक्यात बातम्या –

…अन् राखी सावंत स्पायडर मॅनचा ड्रेस घालून झोपली रस्त्यात, पाहा व्हिडीओ

कोण आहेत तालिबानी? अफगाणी नागरीक का सोडतायेत देश? पाहा व्हिडीओ

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं ओलांडल्या सर्व मर्यादा, इन्स्टावर शेअर केले नको तसले फोटो!

सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका, गॅसच्या दरांबाबत मोठी घोषणा!

मुंबई लवकरच बुडणार?, नासाच्या अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More