Top News तंत्रज्ञान देश

क्रेटाला टक्कर देण्यासाठी MG सज्ज; येतेय ही जबरदस्त कार, पाहा लूक आणि फिचर्स

नवी दिल्ली | ब्रिटिश कंपनी मॉरिस गॅराजेज भारतात पुढील वर्षी आपली जबरदस्त इलेक्ट्रिक कार MG ZS EV चे पेट्रोल वेरियंट लॉंच करणार आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटच्या या कारच्या लाँचिंगची वाहन चाहत्यांना एक वर्षापासून उत्सूकता आहे. एमजी झेडएस पेट्रोल यावर्षी लाँच होणार होती. परंतु, करोना मुळे ती होऊ शकली नाही.

२०२१ मध्ये एमजी झेडएसचे पेट्रोल वेरियंट लाँच करण्यात येणार असून, या कारमध्ये व्हील साइज १७ इंचाची आहे. एमजीच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये एमजी हेक्टर प्रमाणे १.५ लीटरचे पेट्रोल इंजिन दिले असून, ते १४१ बीएचपीचे पॉवर जनरेट करते.

कारमध्ये एसयूवीचे फीचर्समध्ये अॅपल कार प्ले, अँड्रॉयड सपोर्ट सोबत १०.१ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे. ३६० डिग्री कॅमेरा आणि नेविगेशन सारखे फीचर्स दिले असून, यात मल्टी फंक्शनल स्टियरिंग, सनरूफ आणि स्मार्ट कनेक्टिविटी सारखे फीचर्स पाहायला मिळतील.

तसेच सेफ्टी फीचर्स मध्ये रियर पार्किंग सेन्सर, एअरबॅग्स, सीट बेल्ट अलर्ट, सह अनेक फीचर्स असणार आहेत. या कारमध्ये नवीन ग्रील प्रोजेक्टर, एलईडी डीआरएल हेडलँम्प, स्पोर्टी बंपर स्टायलिश फॉगलँम्प लावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

वाहनचालकांना मोठा दिलासा; फास्टटॅग लावण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदवाढ

2020 पेक्षा 2021 जास्त धोकादायक असेल?; WHOनं दिला ‘हा’ मोठा इशारा

कोरोनात तुमची नोकरी गेलीय का?; अशाप्रकारे सरकारकडून मिळवा ३ महिन्यांचा ५० टक्के पगार!

शेजारील विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी त्यानं चक्क बोगदा खोदला; त्यानंतर…

रिया चक्रवतीच्या चाहत्यांसाठी नव्या वर्षात गुडन्यूज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या