देश

केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?

नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आलं आहे.

येत्या 8 जूनपासून सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. लॉकडाउन आता फक्त कंटेनमेंट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील

प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

1. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार

2. कंटेनमेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन

3. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदीर,मशिद धार्मिक स्थळं उघडणार

4. रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार

5. रेड झोन बाहेर 8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी

6. राज्यांतर्गत व राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही

7. कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही

8. दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार

9.प्रतिबंधित क्षेत्रे राज्येच ठरवणार

10.प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू

11.शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय

12. राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार

ट्रेंडिंग बातम्या-

सरकारने आकड्यांची बनवाबनवी थांबवावी- देवेंद्र फडणवीस

दिल्ली कोरोनाच्या चार पावलं पुढे आहे- अरविंद केजरीवाल

महत्वाच्या बातम्या-

देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला; केंद्र सरकारकडून नियमावली जारी

ठाकरे सरकार कुठे कमी पडतंय?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“राज्याला केंद्राकडून सहकार्य मिळालं नाही असं आम्ही कधीही म्हटलं नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या