‘ये तो सोची समझी चाल’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची भाजपवर टीका
मुंबई | सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात उचलबांगडी झालेले मुंबईचे माजी पोेलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. माजी आयुक्तांनी केलेल्या आरोपामुळे विरोधी पक्ष भाजपने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सिंह यांनी केलेले सर्व आरोप अनिल देशमुखांनी फेटाळून लावले आहेत. मात्र अशातच ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे भाजपचं षडयंत्र असल्याचंं म्हणत भाजपवरच निशाणा साधला आहे.
परमबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न होतो. हे भाजपचं कटकारस्थान आहे. ही ‘सोची समझी चाल’ आहे. यात चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये. भाजप सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षावर टीका केली आहे.
हे भाजपचं षडयंत्र आहे. आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना भेटले आणि मग परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यामुळेच संशय बळावला असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तर अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळून लावले असून त्यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह एवढे दिवस शांत का बसले होते?, त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडलं नाही, असे काही सवाल देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहेत.
थोडक्यात बातम्या-
कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा?- चित्रा वाघ
‘…त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे’; नारायण राणेंच्या आरोपाने खळबळ
धक्कादायक! नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद टोकाला, तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या
काँग्रेस काय पाकिस्तानमधून आलेली आहे का?- संजय राऊत
काय सांगता! वय वर्ष 41 मात्र तरीही ‘ही’ अभिनेत्री दिसते इतकी हॉट, पाहा फोटो!
Comments are closed.