शेकाप आमदार जयंत पाटील यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण
रायगड | शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व आमदार जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: या संदर्भात माहीती देत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच जयंत पाटील यांनी माझी तब्येत ठिक असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
शेकापचे आमदार यांनी काही दिवसांपुर्वीच कोरोना प्रतिबंधक लस टोचुन घेतली होती, तरीही त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने कोरोना लसीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सामान्य जनमाणसात आता कोरोना लसीबाबत साशंकता निर्माण होत असताना दिसत आहे.
कोरोना लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही का? या प्रश्नावर उत्तर देताना वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ लोकांनी सांगितलं की, लसीकरण झाल्यानंतर जवळपास एक ते दिड महीना कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लागणाऱ्या अॅँटीबाॅडीजला तयार होण्यासाठी लागतो, त्यामुळे लस घेतल्यानंतर काही काळ विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी बोलुन दाखवलं.
यापुर्वी प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनाही कोरोना लस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची घटना घडली होती. आता परत एका आमदारालाच कोरोना झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण लस घेतल्यानंतरही काळजी घेणंही तितकचं गरजेचं असल्याचं डॉक्टरांकडुन सांगण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या –
भारत नानांवर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांना विजयी करणारच- सुप्रिया सुळे
शेकाप आमदार जयंत पाटील यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण
मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत; जाणून घ्या कारण
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशमधील वातावरण खवळलं
राष्ट्रवादीने शब्द पाळला! राष्ट्रवादीकडून नानांच्या वारसदारालाच उमेदवारी जाहीर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.