बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचा पडळकरांना पाठींबा

मुंबई | राज्यात सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकर रोखठोक अंदाजात मोठ-मोठ्या नेत्यांवर टीका करत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडळकरांनी पवारांवर टीका केली होती.

बुधवारी पडळकर सोलापूरमध्ये असताना त्यांच्या गाडीवर एका अज्ञाताने हल्ला केला. या हल्ल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार मेघना बोर्डीकर यांनीही शरद पवारांवर निशाणा साधत गोपीचंद पडळकरांना पाठींबा दिला आहे.

गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच शरद पवारांवर टीका करताना जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा जाहीर निषेध, असंही मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. त्यानंतर पडळरांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधत हल्ल्याच्या व्हिडीओ ट्विट करत पवारांना टोला हाणला आहे.

दरम्यान, प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे, असं म्हणत पडळकरांनी पवारांवर पुन्हा निशाणा साधला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

गोपीचंद वि. राष्ट्रवादी संघर्ष पेटला??; गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

मोठी बातमी! नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खळबळजनक पत्र

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

अजित पवारांना मोठा झटका! पवारांच्या जवळच्या व्यक्तीची संपत्ती जप्त, इतक्या कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

बाबो! आज सोन्या-चांदीचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले; वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More