बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अयोध्या दौऱ्यानंतर भाजप-मनसे युतीची शक्यता; राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

ठाणे | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी मित्रपक्षांमध्ये कोरोना लसीकरण शिबिरावरून वाद सुरू आहे. तसेच आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजप युतीसाठी हात मिळवणी करताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आगामी काळातील अयोध्या दौरा झाल्यानंतर युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक तीन सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवीन प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. ही रचना जुन्या पद्धतीने म्हणजेच मागील झालेल्या जणगणनेनुसार प्रभागांची रचना करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत.

नवीन प्रभाग रचनेच्या निर्मीतीनंतर ठाणे महापालिकेत प्रभागांची संख्या 44 इतकी होणार असून नगरसेवकांची संख्या मात्र जुनीच 131 इतकीच राहणार आहे. सध्या ठाणे मनपामध्ये मनसेचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे आता ठाण्यात चांगलंच राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी काळात मनसे पालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण तयारीशी उतरणार आहोत. राज ठाकरे यांना अयोध्या भेटीचे आमंत्रण मिळाले आहे. तसेच ते हा दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यानंतर युती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

दोन वर्षात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? निलेश राणेंची शरद पवारांवर जळजळीत टिका

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More