“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये”
मुबंई | शिवसेनेचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे प्रयत्न चालू आहेत. आदित्य ठाकरेंचा भिवंडीत मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शिंदेगटावर हल्लाबोल केला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तरही दिलं. आता मात्र या आरोप-प्रत्यारोपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे.
रेल्वे इंजिन भाड्याने द्या अशी टिका मध्यंतरी शिवसेनेनं मनसेवर केली होती. आता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या शालिनी ठाकरे यांनी या टीकेची आठवण करून देते मनसेवर निशाणा साधला आहे. रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणून उपदेश देणाऱ्यावर शिवसेनेचे धनुष्यबाण आता डोहाळ जेवणाला भाड्याने देण्याची वेळ आली आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.
मनेसेचा शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा असल्याचं दिसून आलं आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेते(Shivsena) लढाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदेनी बंड केल्यानंतर शिवसेना कोणाची हा वाद निर्माण झाला होता. ही राजकीय लढाई कोर्टात जावून पोहोचली होती. सध्या कोर्टात सुरु आहे. शिंदे गटाने एवढ्यावरच न थांबता शिवसेनेच्या धनुष्यबाणावरही हक्क सांगितला आहे. यावर ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या भात्यातून कितीही बाण मारले तरी शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच आहे, असं ते म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या
राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका!
मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय
“शिंदे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच तुम्ही लिहुन घ्या”
अत्यंत सुमार दर्जाचा ट्रेलर!, ‘मी पुन्हा येईन’ फ्लॉप होण्याची शक्यता
“मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही”
Comments are closed.