बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही, लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या”

मुंबई | देशात सध्या कोरोनाने हैदोस घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे. मात्र आता लसींचा तुटवडा कमी पडू लागल्याने लसीकरण मोहिम मंदावली आहे. उत्तर प्रदेश सरकारने फक्त त्यांच्या नागरिकांनाच लस देण्याचा जो निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची भयंकर परिस्थिती समोर आहे. दिवसाला सरासरी 50 हजारांपेक्षा अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. या महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला पाहिजे. मात्र उपलब्ध लसीच्या साठ्यावर मर्यादा असल्याने अनेक लोकांना लसीकरणापासून वंचित राहावं लागत आहे. देशात 1 मे पासून 18 वर्षावरील सगळ्यांना लस देण्याची घोषणा करण्यात आली. राज्यातही 18 वर्षावरील लोकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे पण म्हणावा तसा वेग यात आला नाही असं गणेश चुक्कल यांनी सांगितलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारने फक्त त्यांच्या नागरिकांनाच लस देण्याचा जो निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारनेही घ्यावा. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, यासाठी लसीचे डोस खरेदी करण्याची जबाबदारीही राज्य सरकारवर असेल तर या लसीकरणासाठी स्थानिकांनाच प्राधान्य का देण्यात येऊ नये?, असं चुक्कल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान,  जर यूपी सरकार स्थानिकांना लस देण्याचा निर्णय घेऊ शकतं मग महाराष्ट्र सरकारनेही याचा विचार करायला हवा. राज्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात लसीचे डोस कमी प्रमाणात आहेत. अशावेळी ज्यांच्याकडे स्थानिक पत्ता असलेले ओळखपत्र असेल अशाच लोकांना लस देण्यासाठी प्राधान्य द्यावं, अशी मागणी गणेश चुक्कल यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय’; यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा

राहुलचा मृत्यूआधीचा व्हिडीओ शेअर करत पत्नीने रूग्णालयावर केले आरोप, मरणापूर्वीचा व्हिडीओ आला समोर

“भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेंचा झाला”

‘…हे पाहून अतिशय दु:ख होतय’; लालू प्रसाद यादव यांनी मोदींना सुनावलं

“अभिनेता अरबाज खानकडूनही परमबीर सिंह यांनी पैसे घेतले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More