बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“1 लाख जण अंगावर आले तर काय कराल?”, राज ठाकरेंचा सवाल

नाशिक | एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचं शासनात विलीगीकरण व्हावं, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन पुकारलं होतं. आता बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे जरी घेतलं असलं तरी अद्याप काही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून ठाकरे सरकारवर (CM Uddhav Thackeray) आक्रमक टीका केली आहे.

राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी संपावर अधिकृतरित्या बोलायला हवं. एक लाख कर्मचारी अंगावर आलं तर काय कराल?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

एसटी संप, रद्द होणारी परीक्षा, एआयएमआयएमने काढलेली तिरंगा रॅली, रजा अकादमी दंगल त्याचबरोबर ओबीसी आरक्षण आणि राहुल गांधी यांचं वक्तव्य, या विषयांवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. अरेरावीची आणि कायद्याची भाषा बोलू नये, हे योग्य नाही, असंही राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, 4-4 महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्या या टीकेवर आता ठाकरे सरकार काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“चौकीदारला आपलं ट्विटर अकाऊंट वाचवता येत नाही, देश काय वाचवणार?”

ST Strike | “लोकांवर अरेरावी करण्यासाठी हे राज्य तुमच्या हातात दिलं नाही”

“आव्हाड साहेब, जमत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा”

“देवेंद्रजी पवार साहेबांवर टीका करतात आणि चमत्कार घडतात, 2024 मध्येही..”

एसटी संप: “आता माघार नाही, जी कारवाई करायची ती करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More