Top News

पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी मराठीतून दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वारकऱ्यांना पायी वारीला जाणं बंधनकारक केलं होतं. आषाढी एकादशीचा दिवश महाराष्ट्रात फार महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. “आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी”

 

 

तर गृहमंत्री अमित शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यासारख्या संतांनी विषमतेच्या भिंती दूर सारून समाजात समानता आणि सलोखा निर्माण केला. अश्या सर्व महान संतांना कोटी कोटी नमन! जय जय पांडुरंग हरी! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.”

 

 

दरम्यान, अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आषाढी एकादशी निमित्त चाहत्यांना मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्यात.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

“जर विठ्ठलच सगळं करणार असेल तर तुम्ही कशाला पाहिजे?, सत्तेच्या बाजूला व्हा”

वंचित बहुजन आघाडीकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सुशांतवर गैरवर्तनाचे आरोप केले नाहीत, या अभिनेत्रीचा पोलिसांसमोर खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या