मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार!

दिल्ली | भारतीय रेल्वेची तक्रार चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पालम स्टेशनवर चेतक एक्स्प्रेसचा स्टॉप करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कानाडोळा केल्याने रेल्वे प्रवासी संघटनेने ट्रम्प यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.

 रेल्वे प्रवासी संघटनेने डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरच्या माध्यमातून पत्र पाठविले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि रेल्वे मंत्रालयाकडे या मागणीबाबत प्रस्ताव पाठविला. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.  

दरम्यान, रेल्वे संघटनेनं केलेल्या तक्रारीची दखल डोनाल्ड ट्रम्प घेतायेत की नाही, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू

-उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!

-मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?; विनायक मेटेंचा सवाल

-आगोदर आपल्या लोकांना संभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी

-आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे