बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 367 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 408 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 5 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,35,770 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4,696 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,12,570 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागिरकांना दक्षता घ्यायली हवी, महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

‘…म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे’; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

”मी माझ्या घरच्यांना सांगितलंय माझे कपडे लाॅन्ड्रीत टाकू नका, नाहीतर…”

”ज्यांच्या भावना नालायक असतात, तेच नालायकासारखं बोलतात”

नाशकात पावसाचं थैमान! गंगापूर धरण ओव्हरफ्लो तर, गोदावरी नदीला पूर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More