बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

3 वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी; बुलडाण्यातील मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

बुलडाणा | कोरोनाच्या काळात अनेक लोक आपला जीव गमवत आहेत. तसेच आत्महत्येच्या घटना देखील समोर येत आहेत. महाराष्ट्रात या अठवड्यात आत्महत्याच्या प्रचंड घटना उघडकीस आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्यानंतर आता बुलडाणा येथे ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विवाहीत महिलेने तिच्या चिमुकलीसोबत विहिरीत उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुलडाणा येथील माळवंडी येथे एका विवाहीत महिलेने तिच्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन विहिरीत उडी मारली. संबंधित माय लेकीने स्वतःच्याच शेतातल्या विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.

या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले. पोलीस आता याबाबतचा तपास करत आहेत. तसेच घटनास्थळी देखील तपास चालू आहे.

दरम्यान, माय लेकीच्या या आत्महत्येमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटनेचा तपास रायपूर पोलीस करत आहेत. तसेच अचानक झालेल्या या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे

दगडाने ठेचून तरुणाची हत्या; भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला

YouTube कडून महिन्याला मला ‘इतके’ पैसे मिळतात- नितीन गडकरी

मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय, शिवसेना आमदार खूश, राष्ट्रवादीचा मंत्री नाराज!

“डिपॅाझिट जप्त झालेल्या माणसाला आमदारकी मिळाली फक्त अजितदादांच्या जपामुळे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More