बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पाहा व्हिडीओ

अमरावती | आपल्या बेधडक अंदाजामुळे खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा नवनीत राणा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. नवनीत राणा यांनी स्पर्धकांसोबत धावून महिलांना प्रोत्साहन दिलं आहे.

राजस्थानी हितकारक महिला मंडळातर्फे महिलांसाठी रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलाचं मनोबल वाढविण्यासाठी त्या स्वत:ही स्पर्धेत धावल्या. विशेष म्हणजे नवनीत राणा केवळ स्पर्धेत धावल्याचं नाहीत. तर त्यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमाकं देखील पटकावला आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रागंणात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

“महिलांनी शारिरीक व मानसिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी व्यायाम करावा व स्वत:ला सुदृढ ठेवावे. महिला आता सर्व क्षेत्रात अग्रेसर असून चूल व मूल या पलिकडे जाऊन महिलांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे”, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या आहेत. नवनीत राणा यांनी यावेळी राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या उमक्रमाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी ट्विटर हा व्हिडीओ शेअर केला आहे. नवनीत राणा या आमदार रवि राणा यांच्या पत्नी आहेत. नवनीत राणा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकवेळा त्या महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येतात.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?, काँग्रेसमधील घडामोडींना वेग

मोदी सरकारची भन्नाट योजना, मिळणार तब्बल 36,000 रूपये

JIO ग्राहकांसाठी खुशखबर! नववर्षाआधी आणला ‘हा’ भन्नाट प्लॅन

“जीन्स घालणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत, फक्त ‘त्या’ महिलांवरच…”

मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी पायी बालाजीला निघालेल्या शिवसैनिकाचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More