बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता तरी सरकारनं जागं व्हावं’; खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई | कोरोना महामारीमुळे देशातील अनेक लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यातच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राज्यात अनेक तरूणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे.

परतुर तालुक्यातील येनोरो येथील सदाशिव भंबर या तरूणाने आत्महत्या केली होती. आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरूण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही मराठा समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासोबत सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यामातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध करून द्यावा अशा इतर अनेक मागण्या केल्या आहेत, असं संभाजीराजे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.

आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक असल्याचं सांभाजीराजे यांनी म्हटलंय.

दरम्यान, प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे सरकारला माझी सूचना आहे की सरकारने आता तरी जागे व्हावे आणि याविषयात जातीने लक्ष घालावं. त्याचबरोबर अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, असं देखील संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशासह राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या संशयितांनी ‘या’ कॅम्पमधून घेतलं होतं प्रशिक्षण!

मेव्हणीसोबत पळाला, बायकोची आठवण आल्यावर तरूणाने केलं धक्कादायक कृत्य

आर्या खरंच गायकाला डेट करते का?; आर्या आंबेकरचा खुलासा

“महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या मग भागवतांच्या का नाही?”

“उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होईल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More