Top News

मुंबईत विनामास्क फिरल्यास भरावा लागणार ‘इतका’ दंड; पालिकेकडून आदेश जारी

मुंबई | मुंबईत मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर कोणी मुंबईत विनामास्क फिरल्यास आढळले तर त्याच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

जो कोणी मुंबईत विनामास्क फिरताना आढळल्यास त्याच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. जो कोणी या आदेशाचे उल्लघंन करेल त्याच्यावर कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणं बंधनकारक आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत दरदिवशी जवळपास एक हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

“मुंबईतील कोरोनाच्या दयनीय अवस्थेला मुख्यमंत्रीच जबाबदार”

भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या