बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांना मोठा दणका! मुंबई उच्च न्यायालयाने दिली ‘ही’ सूचना

मुंबई | मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. यातच याप्रकरणावरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले होते. अशातच आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा दणका दिला आहे.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांच्याविरूद्ध सव्वा कोटी रूपयांचा मानहाणीचा दावा दाखल केला होता. तसेच कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह बोलण्यास मलिक यांना मनाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती.

अशातच आता मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर नवाब मलिक सोशल मीडियावर देखील वानखेडे यांच्या कुटुंबीयांविषयी काहीही लिहणार नसल्याची वकिलांनी उच्च न्यायालयात दिली आहे.

दरम्यान, पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतंही वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या वकिलांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं म्हटलं होतं. वकिलांचा हा मुद्दा न्यायालयात मान्य झाला नाही.

थोडक्यात बातम्या-

“या सर्वांना जबाबदार कोण? मोदी सरकार पूर्ण नापास”; भाजप खासदाराचे खडे बोल

“एकेरी उल्लेख करता, तुमचं कर्तृत्व काय?”, संजय राऊतांनी घेतला पडळकरांचा समाचार

आझाद मैदानातील आंदोलनातून भाजपचा काढता पाय; सदाभाऊ म्हणाले…

“शशिकांत शिंदेंना ठरवूनच पाडलं, शिंदेंचा विजय झाला असता तर…”

“आता महिलांनी घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More