मुंबई | राज्य सरकारने रात्री 11 ते सकाळी 6 या काळात संचारबंदी म्हणजेच नाईट कर्फ्यू लागू केलीये. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजीचा सूर लावलाय.
दरम्यान याच कारणास्तव हॉटेल व्यावसायिकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे.
आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ वाढवून देण्याची मागणी केलीये. हॉटेलं सुरू ठेवण्याची वेळ रात्री 11 पर्यंतची वाढवून दीड वाजेपर्यंत करावी अशी मागणी करण्यात आलीये.
25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा हॉटेलच्या व्यवसायाचा काळ असतो. त्यामुळे या याकाळात हॉटेल्स लवकर बंद केल्यास मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल, असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे.
थोडक्यात बातम्या-
पुण्यात पुन्हा दिसला गवा; वनविभागानं नागरिकांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन
फक्त इंग्लंडच नाही तर ‘या’ देशांमध्येही झालाय नव्या कोरोनाचा प्रसार
“ब्रिटनमधील नवीन विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असण्याची शक्यता”
‘सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही पण…’; कोरोनाच्या नव्या विषाणूवर WHO दिली महत्वाची माहिती
कोरोना लसीचा धसका!; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल