मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
मुंबई | आयपीएल म्हणजे नुसती धमाल… ही धमाल प्रेक्षकांसाठी असतेच, पण त्याशिवाय त्याहून जास्त धमाल आयपीएल खेळणारे खेळाडू करत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून संघाच्या डेसिंगरूमचे किस्से ऐकायले भेटतात. मुंबई इंडियन्सच्या डेसिंगरूमचे किस्से हार्दिक पांड्या नेहमी सांगत असतो. त्यानंतर आता गतविजेता संघ मुंबई इंडियन्सने मागील वर्षीच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे.
मुंबई इंडियन्स म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही किंवा एखादा खेळाडू नाही. एखादा कोच नाही तर संघाचा मालक सुद्धा नाही. ज्याच्या छातीवर मुंबई इंडियन्सचा बॅच आहे, ते सगळे मुंबई इंडियन्स परिवाराचे सदस्य आहेत, असं रोहित शर्मा या व्हिडीओत म्हणत आहे. तर आम्ही त्या संघासोबत राहतो, ज्यात आम्ही आमच्या कामगिरीबद्दल जागरूक असतो. आम्ही आमच्या शैलीवर भर देतो. त्यामुळेच कदाचित आम्ही जिंकत आलो आहेत, असं संघाचा प्रमुख खेळाडू कायरन पोलाड म्हणला.
आम्ही ज्याप्रकारे खेळत आहोत. खेळाडू ज्याप्रमाणे खेळतात. त्यामुळे आम्हाला प्रत्येक हंगामात हळू सुरुवात भेटते. पण शेवटी आम्ही चांगली कामगिरी करतो, असे हार्दिक पांड्या म्हणाला. मुंबईचे खेळाडू नेहमी मस्ती करताना दिसतात. फक्त क्रिकेट खेळत नाही तर त्याबरोबर फुटबॉल, गोल्फ, बास्केट बॉल यांसारखे इतर खेळ देखील खेळतात.
दरम्यान, मुंबईच्या संघात रोहित शर्मा, डिकॉक, सुर्यकुमार यादव, ईशान किशन यांसारखे आक्रमक फलंदाज लाभले आहेत. हार्दिक पांड्या, कायरन पोलाड, कृणाल पांड्या यांसारखे ऑलराऊडर खेळाडू आहेत. तर ट्रेंड बोल्ट, जसप्रीत बुमराह सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत.
पाहा व्हिडीओ –
थोडक्यात बातम्या-
DySP व्हायचं स्वप्न अधुरं, पुण्यात शेतकऱ्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू
मोठी बातमी- फक्त गृहमंत्रीच नव्हे ‘या’ दोन खात्यांचे मंत्रीही बदलणार!
‘या’ नेत्याची गृहमंत्रिपदी नेमणूक करा; मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र
कोरोनाबाधित आईसोबत राहण्यासाठी मुलाचा हंबरडा, जिल्हाधिकाऱ्याचे धरले पाय!
कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात; सहिसलामत सोडण्यासाठी घातली ‘ही’ अट
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.