मुंबई | अभिनेता रणबीर कपूर त्याच्या दर्दी अभिनयामुळे नेहमी चर्चेत असतो. रणबीर कपूरला फिल्म इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय म्हणून देखील ओळखलं जातं. आता वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. त्याला कारण ठरलीय त्याची ‘रेंज रोवर’ कार.
रणबीरकडे आलिशान रेंज रोवर कार आहे. ही कार मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही गाडी ‘नो पार्किंग’ मध्ये उभी होती. त्यामुळे पोलिसांनी रणबीरची गाडी एका दिवसासाठी ताब्यात घेतली. मुंबई पोलिस ट्रॅफिकच्या बाबतीत फार कटाक्ष समजले जातात. अभिनेता असो वा सामान्य माणूस चुकीला अजिबात माफी नाही.
राजीव कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर कपूर परिवाराला मोठा धक्का बसला आहे. चुलते राजीव कपुर आणि रणबीर यांचे जवळचे संबंध होते. चुलते नव्हे तर मित्रच असं त्यांचं नातं होतं. ऋषी कपूर आजारी असताना राजीव आणि रणबीरमध्ये दुरावा निर्माण झाला होता. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर काही दिवसात राजीव कपुर यांच्या अचानक जाण्याने रणबीर एकटा पडलाय ,असं त्याच्या जवळच्यांचं म्हणणं आहे.
रणबीरच्या चाहत्यांना त्याच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटांची उत्सुकता आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन , आलिया भट, नागार्जुन, डिंपल कपा़डिया यांचा दमदार अभिनय पहायला मिळणार आहे. तूर्तास मात्र त्याच्या गाडीच्या नो पार्किंगची चर्चा रंगली आहे.
थोडक्यात बातम्या-
“मंत्री झाल्यावर मला कळालं, की त्यासाठी फार अक्कल लागत नाही”
गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक; अजित पवारांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट!
साताऱ्यातील पोरींमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचं खरं कारण आलं समोर, पाहा व्हिडीओ
आंदोलनजीवी! शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात मिटअपचं आयोजन
“…लायकी नसताना शरद पवारांसारख्या नेत्यावर आरोप करू नये”