बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्याच्या सेवेत आम्ही कधीच कमी पडणार नाही”

मुंबई |  खाकी वर्दी कायमचं आपल्या अंगावर ऊन-वारा-पाऊस झेलत देशातील तसंच राज्यातील जनतेच्या संरक्षणाच्या कामी आपले 24 तास देत असते. राज्यातील जनती सुखी रहावी म्हणून ते अहोरात्र झटत असतात. मग सण-उत्सवाच्या काळात जागता पहारा असो की देशावर तसंच राज्यावरील दहशतवादी हल्ला असो…. अशा अनेक संकटाच्या काळात खाकी आपलं कर्तव्य बजावत असते.

आज देशात कोरोनाने आपलं भयान रूप दाखवलं आहे. अशा वेळी महाराष्ट्र पोलिस आपल्यासाठी मैदानात उभे ठाकले आहेत. आपण सुरक्षित रहावं म्हणून ते रस्त्यांवर उतरले आहेत. आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुंबई पोलिसांनी कर्तव्याचा धर्म आम्ही कायमस्वरूपी पाळू, असा विश्वास जनतेला दिला आहे.

महाराष्ट्र दिनाला मुंबई पोलिसांनी एक खास ट्विट केलं आहे. हे ट्विट मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. त्या ट्विटमध्ये म्हटलंय, “कुठलंही राज्य तिथल्या लोकांमुळे ओळखलं जातं, म्हणून लोकांची सेवा म्हणजेच राज्याची सेवा! या राज्य-सेवेत आम्ही कधीच कमी पडणार नाही असे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आश्वासन देतो”.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना कोरोनारूपी संकटाला परतावून लावण्यासाठी नागरिकांना घरात बसण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या हातून कोणत्याही कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन करत आपण या संकटावर लवकरच मत करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल”

पुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार!

महत्वाच्या बातम्या-

कोरोनातून बरे झालेल्या नर्सचं ढोल ताशा लावून स्वागत; पिंपरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा?; महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत उद्धव राज्यपालांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या योगदानाचा भारताला अभिमान; महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं मराठमोळं ट्विट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More