बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर देवेंद्र फडणवीसांचं सर्व नेत्यांना आवाहन, म्हणाले…

मुंबई | एक्स्प्रेस वेवरील अवजड वाहनांची वाहतुक वाढल्याने दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. ट्रक चालक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे छोट्या वाहनांस वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

विनायक मेटेंच्या (Vinayak Mete) अपघाती मृत्युनंतर विधानसभेत त्यांच्या मृत्युवरून लक्षवेधी दाखल केली होती. यासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चर्चा केली. एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादा असुन, आमदारांना लाख लाख रुपयांचे दंड भरावे लागतात. अनेकांनी सांगितलं की जे मिळतं ते सगळं तिकडंच जातं, असं अजित पवार म्हणाले.

एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या वाहतुक कोंडीवर पर्याय काढू. चौथ्या लेनचे काम सुरू करू, असं फडणवीस यांनी सांगितलं. राजकीय नेत्यांनी रात्रीचा प्रवास करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More