बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत फक्त ‘या’ पाच स्थानकांवर टॅक्सी सेवेला मंजुरी

मुंबई | मुंबईत टॅक्सी सेवा सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि दादर या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध असणार आहे.

प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि घर यादरम्यान प्रवासासाठीच टॅक्सी सेवा उपलब्ध राहील. देशभरात आजपासून काही रेल्वे धावणार असल्यामुळे बाहेरगावाहून मुंबईत आलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी आणि ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे.

टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी रेल्वे स्थानकावरच मुंबई टॅक्सीमेन्स संघटनेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या प्रवाशांना टॅक्सी आरक्षित करायची आहे, त्यांना फोन किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करता येईल.

आजपासून सुरु होणाऱ्या ट्रेनमध्ये मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांनी आंतरराज्य प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे, मात्र राज्यांतर्गत प्रवास करता येणार नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, पण कारभारावर सडकून टीका!

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचं शिवप्रेमींना आवाहन, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी रुपये जमा, केवळ 7 टक्के रक्कम आरोग्य सुविधांसाठी खर्च”

कोरोना योद्ध्यांवर हल्ले करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी खडसावलं, म्हणाले…

पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More