Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार!

मुंबई |  मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्रथम सत्र हिवाळी परीक्षा या अंतिम वर्षाप्रमाणेच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.

वाणिज्य, कला, विज्ञान या पारंपरिक शाखांच्या महाविद्यालयांची पदवी, पदव्युत्तर क्लस्टर महाविद्यालये अशी विभागणी केली असून त्यामध्ये लीड कॉलेज हे परीक्षेचे नियोजन करेल. क्लस्टरमधील सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा एकाच वेळी ऑनलाइन घेण्यात येतील.

परीक्षेसाठी एक तसाचा कालावधी दिला जाईल. बुधवारी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमान मंडळाने याबाबतच्या सूचना व परिपत्रक जारी केलंय.

ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार हिवाळी सत्राच्या या ऑनलाइन परीक्षा देणं शक्य हाेणार नाही अशा विद्यार्थ्यांची महाविद्यालयांनी नाेंद घेऊन त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी क्लस्टर महाविद्यालयांची असेल, असं मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?- चंद्रकांत पाटील

“मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर…”

वीजबिल माफीसाठी सलून व्यावसायिक आक्रमक, सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करणार

‘भाजप हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी…’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला टोला

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक; दहशतवाद्यांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या