पुणे महाराष्ट्र

परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणं अनिवार्य करा- मुरलीधर मोहोळ

पुणे| जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे विमानतळावर येणारे अन् महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारे नागरिक स्थानिकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळं त्यांना घरी विलगीकरण करण्याऐवजी विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करावे, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

घरात विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश दिले असले, तरी नागरिकांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. परदेशातून परतलेले नागरिक कोरोनाबाधित असतील तर जाताना ते कॅब चालक, त्यांचे नातेवाईक आणि इतर स्थानिकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. असं महापौर म्हणाले.

महाराष्ट्रत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोन व्हायरसच्या रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. पण याबाबत सरकार आणि पुणे महापालिके तर्फे पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.

देशातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 130च्या वर गेली असून. कोरोनामुळं देशभरात 3 जणांचा मृत्यु झाला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाने उभी बाटली केली आडवी; 31 मार्चपर्यंत पुण्यातली दारूची दुकाने बंद!

महागडे सॅनिटायझर खरेदी करू नका आणि मास्कही वापरू नका; तुकाराम मुंढेंनी सांगितल्या सोप्या टिप्स

“50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम न दिल्यास कंपनीवर कारवाई करणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या