मुस्लीम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकलं पाहीजे- दलाई लामा

नवी दिल्ली | पाकिस्तान, सीरिया, बांग्लादेश यांच्यासारख्या मुस्लीम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकलं पाहीजे तरच जगात शांतता नांदेल, असं वक्तव्य तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी केलं आहे.

125 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असूनही भारतात विविध जाती-धर्माचे लोक आहेत. तसेच ते शांततेनं राहतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारतातील सर्व धर्मांमध्ये एक समन्वय असून अहिंसेच्या तत्वामुळे भारताची प्रगती होत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डोकलाम विषयी विचारले असता दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चा करुन हा प्रश्न सोडवावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, मिळाली असती तर आज ते जिंवत असते”

-उमा भारतींचा आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

-राजू आता संपला आहे; ओवैसींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

-भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या योद्ध्याची क्रिकेटमधून निवृत्ती

-“मुज्जफरनगर आणि कैराना प्रमाणे ‘बुलंदशहर’ घडवलं जात आहे का?”