ठाणे | मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पाडव्याचा सभेचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळाले. राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यात मोठा गोंधळ देखील झाला. आता या सभेतील भोंग्यांबद्दलच्या वक्तव्यावर मनसे नेते सलीम मामा शेख यांनी ठाण्यातील सभेत आपलं मत मांडलं आहे.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मला वेगवेगळ्य स्वरूपात त्रास देण्यात आला. माझा डीएनए चेक करण्यात आला. मी आता सांगतो की माझा डीएनए मौहम्मद पैगंबराचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे, असं सलीम मामा म्हणाले आहेत.
2012 साली नाशिक महापालिकेत आमची सत्ता होती. मला राज साहेबांनी गटनेता केलं, स्थायी समितीचा सभापती केलं, मला गटनेता केलं, माझा नेता कधीही मुस्लिमांच्या विरोधात नव्हता, असंही सलीम मामा शेख म्हणाले आहेत. परिणामी अनेक चर्चांना उत्तर मिळालं आहे.
थोडक्यात बातम्या –
“सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 50 हजार रूपये बक्षीस देणार”
रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाल्या…
“संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर दबाव टाकून…”; प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूूमिपूजन होणार!
“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशाप्रकारचे संस्कार केलेत?”
Comments are closed.