नागपूर | उद्या सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत मोठी रणनीती ठरवल्याचं समजतंय.
4 जुलै ते 20 जुलै दरम्यान नागपूर येथे पावसाळी अधिवेशन होणार आहे. एकूण 13 दिवस अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. त्यामुळे कर्जमाफीतील गोंधळ, बोंडअळी, प्लॅस्टिकबंदी, मंत्र्यांवर लागलेले घोटाळ्यांचे आरोप, इत्यादी मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विरोधकांसोबतच सत्तेत भागीदार असणाऱ्या शिवसेनाही अधिवेशना दरम्यान कोंडीत पकडू शकते. त्यामुळे सत्ताधारी भाजपला विरोधकांसोबतच शिवसेनेचा सामना करावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप
-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री
-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल
-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?
-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला