बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर नाना पटोले कडाडले, म्हणाले…

मुंबई | महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांवर ईडीने (ED) कारवाईचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीतील (NCP) नेत्यांवर कारवाई केल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली.

रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे सख्खे भाऊ व व्यावसायिक श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीने जोरदार धक्का दिला. पाटणकरांच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांसह कोट्यवधींची मालमत्ता ईडीने जप्त केली. ईडीच्या कारवाईनंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून त्या त्रास देत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारला याचा धोका नाही पण भाजपला हे महागात पडेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

दरम्यान, पाटणकरांवरील कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील पाटणकरांवरील कारवाईनंतर टीका केली आहे. तर भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना पुरतं घेरलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आगे आगे देखिए होता है क्या’, नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई, राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

“…तर तो माझा शेवटचा क्षण असेल”, पंकजा मुंडेंचं भावनिक प्रत्युत्तर

शिवसेना आणि भाजप भविष्यात एकत्र येणार?; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं…

“राष्ट्रवादीने टाकलेली ती एक गुगली होती, आता शिवसेनेचं हिंदुत्व फिकं पडतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More