बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांचं ‘हे’ आव्हान मी स्वीकारलं”

नागपूर |  गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने दुप्पट काम केलं असून, त्याबाबत कुठल्याही व्यासपीठावर वाद-विवाद करायला तयार असल्याचं मुख्यमंत्री सांगतायेत. त्यांच हे आव्हान मी स्वीकारलं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ व स्थळ निश्चित करावं, असं आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी आमचं आव्हान न स्वीकारल्यास ज्या ज्या ठिकाणी महाजनादेश यात्रा आयोजित केल्या आहेत तिथे ‘फडणवीस दामदुप्पट पदार्फाश महामेळावे’ आयोजीत करून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडणार आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

फडणवीस हे महाजनादेश यात्रांमध्ये दुप्पट काम केल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांचे वक्तव्य म्हणजे गावोगावी फिरून जनतेला ‘दुप्पट सोने’ करून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्यांची सुधारीत आवृत्ती असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जोड्यानं मारलं पाहिजे- बच्चू कडू

-घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका; 5 ते 7 जणांचा खात्मा

-“शेतकरी आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार”

-…म्हणून राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आऊटगोईंग- रामदास आठवले

-‘हे’ मला आधीच माहीत होतं; राम मंदिराबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More