मुंबई | काही उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने देशाची संपत्तीच विकायला काढली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
नाना पटोले यांनी मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदींनी देशाची संपत्ती विकायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणारे उद्योग कवडीमोल दराने विकले जात आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.
ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही ‘मोदी चले जाव’चा नारा दिला. देशातील आणि राज्यातील एकाही भाजप नेत्याने किंवा भक्ताने याला विरोध केला नाही. मोदी देश बरबाद करत आहेत हे त्यांनाही आता कळून चुकले आहे. त्यामुळे त्या लोकांनाही मोदी नको आहेत, असं नाना पटोले म्हणाले.
इंधन आणि गॅसचे दर वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असून उद्योगपती मित्रांचा फायदा करत आहे. केंद्रातील भाजप सरकार याच पद्धतीने काम करत राहिले तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा नाना पटोले यांनी मोदी सरकारला दिला आहे.
ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही मोदी चले जाव चा नारा दिला. देशातील आणि राज्यातील एकाही भाजप नेत्याने किंवा भक्ताने याला विरोध केला नाही. मोदी देश बरबाद करत आहेत हे त्यांनाही आता कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्याही लोकांना मोदी नको आहेत: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले pic.twitter.com/HCUGvYZGAh
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 15, 2021
थोडक्यात बातम्या-
“तेंडुलकर आणि लतादीदींच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, लता मंगेशकर आमचं दैवत”
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद
…तेव्हा तर काही केलं नाही, आता ढुसण्या मारणं बंद करा- अजित पवार
‘पूजा चव्हणाची हत्या नाही तर…’; धनंजय मुंडेंचं पूजाच्या आत्महत्येबाबत मोठं वक्तव्य!