मुंबई | शिवसेना सोडताना मी बाळासाहेबांना 6 पाणी पत्र लिहिलं होतं. यानंतर साहेबांनी मला फोन केला होता. नारायण रागवला का? एकदा ये, असं साहेब म्हणाले होते. मात्र मी मातोश्रीवर परत गेल्यावर उद्धव ठाकरेंनी मी घर सोडेन, अशी धमकी दिली होती. म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही, असं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
नारायण राणे यांच्या ‘नो होल्डस् बार्ड’ या इंग्रजीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे हे उपस्थित होते. यावेळी नारायण राणे बोलत होते.
आम्ही पक्ष वाढवायला आणि पक्ष वाचवायला काम केलं. पण आता शिवसैनिक ते करू शकणार नाहीत. आता शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत. आम्हाला तर त्यावेळी वडापावही मिळायचा नाही, असं नारायण राणेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, मी पुस्तक लिहिताना सावधगिरी बाळगली आहे. काही गोष्टी टाळल्या आहेत, असंही नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रायगडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना मोठा धक्का
-काँग्रेसकडून 9 वेळा खासदार राहिलेल्या ‘या’ नेत्याची कन्या शिवबंधनात अडकणार???
-शिवसेना सोडून नारायण राणेंनी चूक केली- नितीन गडकरी
-खेकड्यांनंतर तेजस ठाकरेंनी शोधल्या या प्राण्याच्या दोन नव्या प्रजाती!
-विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही- शरद पवार
Comments are closed.