Top News महाराष्ट्र सिंधुदुर्ग

अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे

photo credirt- Amit Shah & Narayan Rane Facebook Account
photo credirt- Amit Shah & Narayan Rane Facebook Account

सिंधुदुर्ग | देशाचे गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गातल्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारला टोला हाणला आहे.

अमित शहा यांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं, असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राणे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ज्या दिवशी ठाकरेंनी आघाडी सरकार स्थापन केलं, त्यादिवशीच त्यांनी हिंदुत्व सोडलं. त्यांनी हिंदुत्वासाठी काहीच काम केलं नाही. शिवसेना धरसोड आहे. बाळासाहेबांनंतर एकही माणूस नाही ज्याने बोललं ते पुर्ण केलं, असं म्हणत राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान,  कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मग आंदोलन का? याच्या मागे काँग्रेस आणि बाहेरचे लोक असल्याचं नारायण राणे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी

अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्येही खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधित्व करण्याची चर्चा!

‘मी 4 वेळा प्रेमात पडलो, पण…’; लग्नाविषयी रतन टाटांचा मोठा खुलासा

सूनेचे सासऱ्यासोबत शारीरिक संबंध दाखवल्यामुळे या वेबसिरीज विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

“अनुपम खेर तुझं आता काही खरं नाही; पिसारा फुलवून पार्श्वभाग दाखवणाऱ्या मोरासारखी अवस्था झालीय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या