बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र आणि केरळला गुजरातपेक्षा जादा मदत करावी- सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची हवाई पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी गुजरताला एक हजार कोटी रुपयांच्या आर्थ‍िक मदतीची घोषणा केली. यावर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधानांना घरचा अहेर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला दिलेल्या आर्थिक मदतीपेक्षा जास्त निधी प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्र आणि केरळला द्यावा, असं भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान गुजरातला गेले आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपयांचा धनादेश दिला. आता त्यांनी प्रामाणिकपणे यापेक्षा अधिक रकमेचा धनादेश महाराष्ट्र आणि केरळला दिला पाहिजे. या ठिकाणी अधिक नुकसान झालं आहे. मात्र मोदींना त्याची पाहणी करण्यासाठी जाता आलं नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र व केरळला मदत द्यावी, असे जाहीरपणे म्हणणारे सुब्रमण्यम स्वामी भाजपचे पहिले नेते आहेत. महाराष्ट्र आणि केरळमधील भाजप नेत्यांनीही ही मागणी केलेली नाही. तसेच सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीही अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. सुब्रमण्यम स्वामी सतत सरकारविरुद्ध बोलताना दिसतात.

थोडक्यात बातम्या- 

“मविआ सरकारच राज्याला लागलेला कोरोना म्हटलं तर राऊतांना आवडेल का?”

“….नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या”

सकारात्मक बातमी | 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

“आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय”

प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड ‘डोमिनोज’ कंपनीचा डेटा लिक; ग्राहकांची ‘ही ‘ माहिती डार्क वेबवर उपलब्ध

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More