नवी दिल्ली | BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजतंय.
गांगुलीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली तसेच जकारणातील अनेक दिग्गजांनी प्रार्थना केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी गांगुलीला फोन करून त्याच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं कळतंय.
दरम्यान, गांगुली राजकारणात येणार अशी चर्चा रंगली होती. तसेच काही दिवसांपूर्वी सौरवने बंगालच्या राज्यपालांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट होती असं नंतर गांगुलीने स्पष्ट केलं होतं.
थोडक्यात बातम्या-
शिवबंधन सोडत ‘या’ शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
शिवसैनिकांनो…सध्या मोर्चाची गरज नाही- संजय राऊत
शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?- किरीट सोमय्या
पत्नीसाठी अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहातून खरेदी केली पैठणी!
आमदार दिलीप बनकरांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!