बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुरुवारपासून ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना सुरु; ‘या’ लोकांना मिळणार लाभ

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी राष्ट्रावादी काँग्रेसने एक खूप महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचेनिमित्त कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींची देखभाल करण्यासाठी एका योजनेची घोषणा करण्यात येणार आहे. या योजनेचे नाव ‘राष्ट्रवादी जिवलग’ असून ही योजना 22 जूलै गुरूवारपासूनच लागू करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीतून फेसबुक लाईव्ह करत यासंदर्भात माहिती दिली. राज्यात अनाथ मुलांच्या आयुष्यात आई-वडिलांची पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील 450 मुलांसाठी प्रेमाचा आधार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात येत आहे.

या योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 450 सहकारी या 450 अनाथ मुलांशी जोडले जाणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी दूत’ निर्माण केले आहेत.  अनाथ मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर अनाथ मुलांसाठी युवक, पुरूष राष्ट्रवादी दूत म्हणून काम करणार असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

हे राष्ट्रावादी दूत अनाथ मुला-मुलींच्या घरी जाऊन त्यांना कशाची गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाकडे देतील. अनाथ मुलांची प्रत्येक माहिती ही संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे असेल. तो सर्व डाटा जमा करून पारदर्शक कारभार केला जाईल. त्याचप्रमाणे याविषयी अन्य माहिती पक्षाच्या वेबसाईटवर आणि माझ्या पेजवरही उपलब्ध राहणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

इथं फक्त सेक्स विकला जातो!; ‘या’ ॲप्सवरही अश्लील व्हिडीओंचा सुळसुळाट

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्यास परवानगी मिळणार?

“तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटे आरोप करताना”, राज कुंद्रा प्रकरणात राखीची उडी

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More