बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर, ‘या’ चेहऱ्यांना मिळाली मोठी संधी

पुणे | राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. तळागाळात पक्ष मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीनं आता कंबर कसली आहे. पक्षाची विचारधारा शहरापासून गावापर्यंत पोहोचवण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी एक चांगलं माध्यम आहे हे ओळखुनच राष्ट्रवादी पक्षानं आपल्या विद्यार्थी काॅंग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये विविध भागातील तरूणांना स्थान दिलं आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये विद्यार्थी काॅंग्रेसचं उभरतं नेतृत्व आकाश झांबरे यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्यानं सर्वत्र या नियुक्तीचं स्वागत करण्यात येत आहे. आकाश झांबरे यांनी अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचं काम केलं आहे. परिणामी पक्ष झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभा असल्याचं निदर्शनास येत आहे.

विद्यार्थी संघटनाला अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी अजुन काही नियुक्या जाहीर केल्या आहेत.यात रोहन सोनवणे यांची प्रदेश सरचिटणीस सर्व विद्यापीठ आणि सिनेट काॅन्सिल, सुयश राऊत प्रदेश सरचिटणीस शिष्यवृत्ती विभाग, आदित्य देशमुख प्रदेश संघटक, राॅबिन कुंजुमोन प्रदेश सचिव, रोहित गमलाडू प्रदेश सचिव, सोनिया नरेश लुंड कोकण विभागीय उपाध्यक्ष व्यवस्थापन, हिंमाशू पंचबुधे पुर्ण व पश्चिम विभागीय उपाध्यक्ष कृषी विभाग, योगेश बागुल शहराध्यक्ष मालेगाव बाह्य, मिर्झा नईम अहमद मुनव्वर बेग अध्यक्ष मालेगाव मध्य या सर्वांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारेला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या विविध पदांच्या माध्यमातून विद्यार्थी आघाडी करणार असल्याचं सुनिल गव्हाणे म्हणाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

“कंगणासारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते”

“…तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्रं भिक घालणार नाही”

“आज सत्य, न्याय व अहिंसेचा विजय झाला आहे”

‘माझा बॉयफ्रेंड माझ्याशी बोलत नाही!’ तरूणीच्या अजब तक्रारीनंतर पोलिसांनी केलं असं काही की…

“जेवढ्या टाळ्या वीर दाससाठी वाजल्या तेवढेच चाबकाचे फटके त्याला दिले पाहिजेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More