Top News

‘मी मरता मरता वाचले’; आयसीयूतून बाहेर येताच नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झालीये. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आता नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर असून त्यांना जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलंय. आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये आल्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वांचे आभार मानत ‘सर्वांच्या प्राथनेमुळेच मी मरता मरता वाचले’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये नवनीत राणा म्हणतात, “गेले 5-6 दिवस अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास झाला. हा प्रवास फार कठीण होता. माझ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या त्या सर्वांचे आभार मानते. तुमच्या प्रार्थनेमुळे आज मी मरता मरता वाचले आहे. आता माझी तब्येत बरी असून चिंता करू नका. याच कारणासाठी मी हा व्हिडीयो शेअर करत आहे.”

नवनीत राणा पुढे म्हणतात, “मी प्रार्थना करत होते की देवाने मला जनतेची कामं करण्यासाठी पुन्हा संधी द्यावी. अखेर देवाने माझं ऐकलं. माझं चांगलं कामं आणि लोकांच्या माझ्यासाठी असलेल्या प्रार्थना यामुळे मी सर्वातून बाहेर पडली आहे. लवकर मी तुमच्यासाठी पुन्हा कामावर रूजू होईन”

6 ऑगस्ट रोजी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी राणा यांच्यावर अमरावतीला घरीच उपचार सुरु होते. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना नागपूरातील रूग्णालयात दाखल केलं. मात्र तब्येत अधिक खाल्यावल्यामुळे त्यांना तातडीने मुंबई हलवण्यात आलं. मुंबईत त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

‘भारत आणि चीन हे दोन महान देश….’; चीननं भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

‘ही’ भारतीय कंपनी खरेदी करू शकते टिकटॉक

पवार कुटुंबातील प्रश्न एका मिनिटात सुटेल- राजेश टोपे

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या