नागपूर महाराष्ट्र

नवनीत कौर राणांची पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी होणार?

अमरावती | नवनीत कौर राणा यांनी बुधवारी विदर्भ दौऱ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना नवनीत राणांनी घेतलेल्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरावतीमध्ये दाखल झाले होते. तेव्हा नवनीत राणा यांनी अजित पवारांच स्वागत केलं.  

गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीनंतर त्या राष्ट्रवादीपासून लांब आणि भाजपच्या जवळ गेल्या होत्या.

दरम्यान, नवनीत कौर यांचे पती आमदार रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक झाले आहेत. ते आता  पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळणार का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…जर असं झालं तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू”

सुप्रिया सुळे Vs विजय शिवतारे असा सामना रंगणार?; भाजपची शिवसेनेला सूचना

“…तर मराठा समाज ओवैसींना कोल्हापुरातून परत जाऊ देणार नाही”

राज ठाकरेंची व्यंगचित्र सभांपेक्षा परिणामकारक; छगन भुजबळांची स्तुतीसुमनं

“गडकरींच्या मनात तसेे काही असते तर ते मला बोलले असते”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या