बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पार्टी आणि पबमध्ये भाजप नेते नेमके कुठे असतात हे उद्यापासून काढायला लावू नका”

मुंबई | महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला आता 2 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकार व त्यांच्या मंत्र्यांवर टीकेची झोड उठली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. शेलारांनी केलेल्या टीकेवर आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे.

‘राज्य सरकार गेल्या 2 वर्षात अनेक समस्यांचा सामना करत इथपर्यंत पोहोचलं आहे, तसेच कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारपेक्षाही चांगलं काम राज्य सरकारने केलं आहे’, असं नवाब मलिक यांनी बोलून दाखवलं आहे. तसेच आशिष शेलारांनी पब, पेग आणि पार्टीत हे सरकार मग्न असल्याच्या केलेल्या टीकेवर मलिकांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सरकार पब आणि पार्टीत मग्न आहे असं म्हणता पण पबमध्ये आणि पार्टीमध्ये भाजपचे नेते कुठे असतात हे उद्यापासून काढायला लावू नका, आमच्याकडे सगळ्यांची माहिती आहे’, असा घणाघाती हल्ला नवाब मलिकांनी आशिष शेलारांवर केला आहे.

‘केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कोणालाही सत्ता स्थापन करता येत नाही, हे भाजपला कळायला हवं होतं’, असं म्हणत दोन वर्षे महाविकास आघाडी सरकार पडेल हे बोलून भाजप थकलं आहे, आता त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही, असा खोचक टोलाही अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी आशिष शेलारांना उद्देशुन लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्ता नको- नरेंद्र मोदी

“हे महाविकास आघाडी नव्हे तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे”

भय्यू महाराज प्रकरणी धक्कादायक खुलासा, चॅटपाहून पोलिसांनाही बसला धक्का

“पहाटेच्या शपथविधीचा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी सल”

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More