बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काय शोकांतिका आहे, नवाब मलिक जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाचा निर्णय घेतात”

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP) तथा मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नवाब मलिकांनी दाऊदशी संबंधित व्यक्तींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ निर्णयावरून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे.

28 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता, असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्यावरून निलेश राणे यांनी एक फोटो शेअर करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय शोकांतिका आहे. हे बघून हसावं की, रडावं ते कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केलेल्या प्रकरणामध्ये नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तरीही मंत्री आहेत. जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक यांचा निर्णय जाहीर केला आहे, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

दरम्यान, नितेश राणे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो आहे. नवाब मलिक जेलमध्ये असून देखील महाराष्ट्र सरकारने मलिकांचा निर्णय जाहीर केला आहे, अशा शब्दात निलेश राणेंनी हल्लाबोल केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्र फडणवीस येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील”

हाय गर्मी ! उन्हाचा तडाखा पाहून महिलेनं चक्क गाडीवर भाजली चपाती, पाहा व्हिडीओ

राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटांसाठी झगडावं लागतंय”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More