बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भगतसिंह कोश्यारींना समजायला हवं ते मुख्यमंत्री नसून राज्यपाल आहेत”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामध्ये अनेक विषयांवरून मतभेद होताना दिसतात. सध्या राज्यपाल हे हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. परंतू यावर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. यावरून मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

भगतसिंह कोश्यारी हे आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत, ते आता राज्यपाल आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली.

राज्यपालांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. यामधील दोन जिल्ह्यांमधील विद्यापीठांच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. यावर आम्हाला आक्षेप नाही मात्र ते या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याला आमचा विरोध असून हा सरकारच्या कामात हस्तक्षेप असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता या बैठका होत आहेत. ही सरकारी कामात ढवळा ढवळ आहे. राज्यपालांकडून राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याचं असंही नवाब मलिकांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”

मोठी बातमी! अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! संकेतस्थळावर लोड येऊ नये म्हणून 4 नव्या वेबसाईट जारी

“शिवसैनिकांनी योग्यच केलं, सत्तेत असलो तरी असले प्रकार सहन करणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More