मुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेचे धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरूणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांनी आणखी एक प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. या प्रकरणात राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.
कालही मंगळवारी आरोप झाले तेव्हा मलिक यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, एखादी तक्रार झाली तर चौकशी होतच आहे. पण जी आरोप करतेय ती कुठेतरी त्यांची नातेवाईक आहे. करुणा शर्मांच्या बहिणीशी धनंजय मुंडेंनी लग्न केलेलं आहे, दोन मुलंसुद्धा आहेत. याच्या मागे काय कारण आहे ते आता मुंडे साहेबच सांगू शकतील.
दरम्यान, धनंजय मुंडेंनी माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याचं तक्रारदार तरूणी रेणू शर्माने म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…अन्यथा मंत्रिपद सोडायला तयार’; वडेट्टीवारांनी हाय कमांडकडे केली ‘ही’ मागणी
उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार- नितीन राऊत
सीरममधून पहिला कोविशिल्ड साठीचा पुरवठा मुंबईत दाखल!
‘धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या नाहीतर…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा
ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच- रेणू शर्मा