बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नवाब मलिकांची राज्य मंत्रिमंडळातून हकलपट्टी करायला लावणार”

मुंबई | राज्यात सध्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीवरुन राजकारण सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यावरुन एकमेकांवर टीका करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय.

नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य मंत्रिमंडळातून हकलपट्टी करायला लावणार, असं म्हणत किरीट सोमय्यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.

आता मंत्री नवाब मलिक यांचं कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे.  अशा व्यक्तीला तांत्रिकदृष्ट्या मंत्रिमंडळात राहण्याचा हक्क आहे का, हे तपासले पाहिजे, असंही सोमय्या यांनी म्हटलं.

दरम्यान, ईडीच्या चौकशीची माहिती समोर आल्यानंतर भाजपकडून नक्कीच नवाब मलिक यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी मागणी केली जाईल, अशी जहरी टीका सोमय्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“वुहानच्या ज्या प्रयोगशाळेत कोरोना सापडला त्याचा मालक बिल गेट्स”

“नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका”

‘युवराजांना पेंग्विन म्हणताना…’, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन

“नवाब का ‘नक़ाब’ उतरेगा और मलिक का ‘मालिक’ बेनक़ाब होगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More