बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिक म्हणतात, ‘मी दुबईला जात आहे, माझ्यावर नीट लक्ष ठेवा’

मुंबई | आर्यन खान प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री यांनी खुलास्यांचा सपाटा लावून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोपांच्या फैरी झाडत अनेक गौप्यस्फोट केले. तर नवाब मलिकांनी केलेल्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

नवाब मलिक हे दुबईसाठी रवाना झाला आहेत. तर दुबईला जाता जाता नवाब मलिक यांनी  उपरोधिक ट्विट करत केंद्रीय तपास यंत्रणांना टोला लगावला आहे. नवाब मलिक म्हणाले की, सर्वांना नमस्कार, मी दुबईला जात असल्याचं तुम्हाला कळवू इच्छितो. तर मी आमच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आवश्यक सर्व परवानग्या घेतल्या असल्याचंही नवाब मलिकांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

मी दुबईला जात आहे आणि मी 24 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात परत येणार असल्याचं मलिकांनी सांगितलं. तर सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि माझ्या हालचालींचा मागोवा घ्यावा, असं उपरोधिक ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. नवाब मलिक दुबईला जाता जाता सरकारी यंत्रणांना टोला लगावून गेले आहेत.

दरम्यान, नवाब मलिक यांनी शुक्रवारी पुन्हा एक पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे विरोधात गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत समीर वानखेडेंच्या नावावर एक बार असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिकांनी केला होता. सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे वानखेडेंवर कारवाई करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

“पण आताही अंधभक्त बोलतील काय हा साहेबांचा मास्टरस्ट्रोक”

भारतातील पेट्रोल-डिझेल आता अमेरिका स्वस्त करणार?; काय आहे नवा प्लॅन?

18 वर्षांवरील सर्वांनाच बुस्टर डोस देण्याबाबत ‘या’ सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला संधी

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More